लेंगरे व परिसरातील विविध कामांसाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरेल : ॲड बाबासाहेब मुळीक
विटा (प्रतिनिधी)
लेंगरे ता. खानापूर येथे केंद्रशासन मान्यताप्राप्त आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आले. केंद्रप्रमुख सौरभ नानासाहेब मंडलिक यांनी परिसरातील नागरिकांना विविध सेवा व सुविधा देण्याच्या हेतू या केंद्राची निर्मिती केली आहे.
या कॉमन सर्विस सेंटर चे उद्दघाटन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड बाबासाहेब मुळीक तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे, ज्ञानमंत्र वारकरी संस्थेचे हभप गणेश डांगे महाराज, आदर्श जि.प.सदस्य फिरोज शेख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किसनराव जानकर, जेष्ठनेते श्रीरंग शिंदे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, लेंगरे सरपंच राधिकाताई बागल, कॉमन सर्विस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक समीर कांबळे, विजयसिंह घोरपडे आदी मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्दघाटन करण्यात आले.
यावेळी ॲड बाबासाहेब मुळीक म्हणाले की शासकीय, निमशासकीय, खाजगी सेवा व सुविधा, सर्व प्रकारचे दाखले, तसेच आधार, पॕन, इतर आवश्यक सुविधा व नेट बॕकिंग अशा विविध सेवा या कॉमन सर्विस सेंटर मधून दिल्या जाणार आहेत. लेंगरे व लेंगरे परिसरातील अनेकांना विविध कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी या केंद्राची महत्त्वाची मदत होणार आहे. असे प्रतिपादन केले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे म्हणाले की, नानासाहेब मंडलिक यांनी लेंगरे गावात सुरु केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना फार मोठे सहाय्य होणार आहे. सर्व विविध शासकीय व इतर कामे सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे भागातील नागरिकांना जलदगतीने सेवा मिळणार आहे. निसर्ग फाऊंडेशन च्या सचिव पदावर काम करणारे नानासाहेब मंडलिक सातत्याने विविध उपक्रमांतून उत्कृष्ट काम करत आहे त्यांनी आज सुरु केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी लेंगरे सरपंच राधिकाताई बागल, नगरसेविका डॉ. वैशाली हजारे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष ॲड बाबासाहेब मुळीक, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुहास शिंदे, हभप गणेश डांगे महाराज, आदर्श जि.प.सदस्य फिरोज शेख, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष किसन जानकर, जेष्ठनेते श्रीरंग शिंदे, सरपंच राधिका बागल, मा. सरपंच प्रशांत सावंत, राष्ट्रवादी कॉग्रेस महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, मादळमुठीचे सरपंच सिध्देश्वर धावड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, युवक तालुकाध्यक्ष स्नेहलकुमार कांबळे, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अजित जाधव, युवक तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल, कॉमन सर्विस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक समीर कांबळे, विजयसिंह घोरपडे, नगरसेविका डॉ. वैशाली हजारे, राष्ट्रवादी कॉग्रेस चे तालुका उपाध्यक्ष नानासाहेब मंडलिक, निसर्ग फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन चंदनशिवे, भगवान जाधव, गणेश धेंडे, प्रमोद भोसले, सोमनाथ मंडलिक, सौरभ मंडलिक, सुरज मंडले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश धेंडे यांनी केले तर आभार सौरभ मंडलिक यांनी मानले.
0 Comments