............
मांगले (राजेंद्र दिवाण)
मांगले कांदे रस्त्यावर मांगले गावच्या हद्दीतील सावडे फाटा येथे पन्हाळा तालूक्यातील सातवे येथील शिवतेज ऊर्फ मोन्या विनायक घाटगे (वय - १८) महाविद्यालयीन युवकाचा प्रेम संबंधातून झालेल्या जबर मारहाणीत उपचारा दरम्यान सीपीआर येथे आज पहाटे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे सातवे गावात तणावपूर्ण वातावरण पसरले असून कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिवतेज याचे गावातील एका तरुणीशी एक वर्षापूर्वी प्रेम संबंध निर्माण झाले होते. या प्रेम प्रकरणाला दोन्ही कुटुंबातून विरोध होता सहा महिन्यापूर्वी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद असून ते प्रकरण न्यायालयात प्रलंबीत असून दोन्ही कुटुंबांच्या वतीने या प्रकरणावर गावपातळीवर तोडगा काढण्यात आला होता. बुधवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी शिवतेज कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे गेला होता. तो सायंकाळी सातवे गावाकडे परत येत असताना शिराळा तालुक्यातील मांगले गावच्या हद्दीत आला असता त्याच्या मागावर असलेल्या संशयितांनी त्याला अडवून धनटेकी नावाच्या शेत जमीन परिसरात नेऊन पाच ते सात जणांनी काठ्या दगड गजाच्या साहाय्याने मारहाण केली या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला यावेळी बच्चे सावर्डे ते मांगले (वारणा धरण ) रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांनी त्याची विचारपूस करून नातेवाईक व मित्रमंडळीच्या मदतीने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शिवतेज हा वारणा महाविद्यालयामध्ये बारावीचे शिक्षण घेत असून त्याच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई भाऊ चुलते असा परिवार आहे. उद्यापासून साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पाश्वभूमी वर ही घटना घडल्याने सातवे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे . या पाश्र्वभूमीवर करवीर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या मारहाणी प्रकरणी भाऊसाहेब दळवी, सौरभ दळवी,अजय दळवी, पतंग दळवी या चौघाजणांवर शिराळा पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा अधिक तपास शिराळा व कोडोली पोलिस करत आहे.
प्रेम प्रकरणाच्या कारणातून सातवे ( ता. पन्हाळा) येथील महाविद्यालयीन तरुणाचा बेदम मारहाण केली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. शिवतेज उर्फ मोन्या विनायक घाटगे (वय१८) असे त्याचे मृतांचे नाव आहे. मारेकर्यांवर तातडीने खुनाचा गुन्हा नोंद करून अटक करा. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे सीपीआर शवविच्छेदन विभाग परिसरात तणाव निर्माण झाला.
याबाबत पोलिस आणि नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवतेज घाटगे याचे एका मुलीवर प्रेम होते. या वरून मुलीच्या नातेवाईकांचा आणि त्याचा यापूर्वी वाद झाला होता. तो बुधवारी सायंकाळी मोटारीतून म्हैस सोडण्यासाठी सातवे ते कांदे मार्गावर गेला होता. त्यावेळी आठ ते दहा जणांनी पाठलाग करून त्याचा टेम्पो अडवला. त्याला काठीने बेदम मारहाण केली. तेथे परिसरातील नागरिक जमा झाले. तसे हल्लेखोरांनी त्याला दुसरीकडे नेऊन विवस्त्र करत मारहाण केली. म्हैस मालकांने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सांगितला.
नातेवाईकानी मांगले भागातील घटनास्थळी धाव घेऊन जखमी शिवतेजला कोडोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तो चालत आणि बोलत होता. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरात आणले. पण मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात हलवले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घडलेल्या प्रकाराची कोडोली पोलीस ठाण्याने गांभीर्याने दखल घेतली नाही. मारेकर्यावर खूनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेतली. शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सीपीआरला भेट दिली. त्याआधी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

0 Comments