जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मंत्री जयंत पाटीलच सोडवणार : प्रकाश जमदाडे
जत (सोमनिंग कोळी) दुष्काळी जत तालुक्याचा नंदनवन करण्यासाठी आणि वंचित 65 गावांच्या पाणी प्रश्नासाठी जत तालुक्याने जयंत पाटील यांना साथ देण्याची गरज आहे मंत्री जयंतराव हेच या तालुक्याचा पाणी प्रश्न सोडू शकतात पहिल्या टप्प्यात त्यांनी सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे. आता योजना मार्गी लावण्यासाठी आपल्या सगळ्यांची वज्रमूठ एक होणे अपेक्षित आहे, जतच्या वंचित भागांचा पाणी प्रश्न सुटत असल्याने माझ्यासह ज्येष्ठ नेते बसवराज काका पाटील, मन्सूर खतीब, भैय्या कुलकर्णी यांच्यासह अनेक राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय या जलसंवाद दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केले.
जत तालुक्यातील संख येथे शनिवारी भाजप काँग्रेसमधील दिग्गज नेते मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. यांनिमित्ताने तालुक्यात गेल्या चार दिवसापासून जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे नव्या विस्तारित योजनेची माहिती 65 गावाचे प्रश्न आणि पाण्यावर राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका जनतेला यात्रेच्या माध्यमातून पटवून सांगण्यात येत आहे या यात्रेस चांगला प्रतिसाद लाभला आहे, दौर्यात नेते सुरेशराव शिंदे, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, ऍड चन्नाप्पा होर्तिकर, माजी सभापती प्रकाश जमदाडे ,मन्सूर खतीब ,भैया कुलकर्णी,सुभाष पाटील, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, उत्तम शेठ चव्हाण, सिद्धू मामा शिरसाळ ,जे.के माळी रमेश बिराजदार यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
प्रकाश जमदाडे म्हणाले , म्हैसाळ योजना आज अंतिम टप्प्यात आली आहे, परंतु या योजनेपासून 65 गावे वंचित होती यासाठी आम्ही सातत्याने गेली पंधरा वर्षे पाठपुरावा करत होतो, मागे खासदार संजय काका पाटील कृष्णा खोरे उपाध्यक्ष असताना अंकली येथे या योजनेचा प्रस्ताव या भागासाठी नागरिकांना दाखवला होता परंतु कृष्णा खोरे पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नव्हता यासाठी अनेकदा आंदोलने उपोषणे पाठपुरावा केला, सुदैवाने आज राज्यात महाविकास आघाडी सरकार आले, या मंत्रिमंडळात जयंत पाटील यांनी जलसंपदा खाते मिळाले आहे.मोठ्या ताकतीने यातून सहा टीएमसी पाण्याची उपलब्ध केले आहे, आत्ता पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. पुढे जाऊन आपणास ही योजना मार्गी लावावी लागेल.
उमदी येथे मंत्री जयंत पाटील यांनी 2024 ही योजना सुरू करण्याचे अभिवचन दिले आहे, मंत्रालय स्तरावर पाठपुरावा तांत्रिक मंजुरीचे काम सुरू आहे योजनेचे डिझाईन करणे तसेच राज्यातील आदर्शवत आणि अत्याधुनिक योजना करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे जत साठी हा क्रांतिकारी आणि तालुक्याचे चित्र बदलणारा निर्णय आहे यासाठी आत्ता आपण सर्वांना राष्ट्रवादीत आणून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी काम करावे लागणार आहे, जयंतराव पाटील यांच्या शिवाय आपल्या भागाचे प्रश्न व पाण्याचा प्रश्न निकाली लागणार नाही त्यामुळे या मेळाव्यास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे, दरम्यान गेल्या च्या दिवसात तालुक्यातील 65 गावात ही यात्रा पोहोचली आहे गाव वेळी मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.
0 Comments